मविआ-एमआयएम एकत्र आले तरी फरक पडणार नाही | देवेंद्र फडणवीस

2022-03-19 1,293

मविआ-एमआयएम एकत्र आले तरी फरक पडणार नाही, भाजपला हरवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत पण जनता भाजपच्या पाठिशी आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलताना म्हणाले की, ते सर्व एकत्रित आले तर, शेवटी ते सर्व एकच आहेत. मात्र या सर्व प्रकारात शिवसेना काय करणार हे आम्हाला पाहायचे आहे. हे हरले तर यांना ईव्हीएम दिसते, बी टीम, सी टीम, झेड टीम दिसून येते. हरल्यानंतर या पद्धतीच्या टीका करत असतात. आता शिवसेना सत्तेसाठी काय करते, हे आम्हाला पाहायचे आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Videos similaires